भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा

samarthachen bal kevilavanen dise | tari kona hanse jan deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥