भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज

sakal tujhe payin manila vishvas | na karin udas atan maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥ मन स्थिर माझें झालेंसे निश्चळि । वारिले सकळ आशापाश ॥२॥ जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥ तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥