भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ नेणोनिया आना

sakal nenoniya ana

सकळ नेणोनिया आना । एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥ पुढति पुढति मना । एकला विठ्ठलुचि जाणा ॥२॥ हेचि गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥३॥ बुझसि तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥४॥ हेंचि भक्ति हेंचि ज्ञान । एकला विठ्ठलुचि जाण ॥५॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥६॥