भजनी मालिका
← भजनांकडे परत

साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार

saje alankar | tari bhogitan bhratar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥ व्यभिचारी चा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥ शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥ तुका म्हणे जिणें । शर्त्ती विण लाजिरवाणें ॥३॥