भजनी मालिका
← भजनांकडे परत

साई खडियातें घेवोनिया माते

sai khadiyaten ghevoniya mate

साई खडियातें घेवोनिया माते । तैसा संसारातें येत रया ॥१॥ सोय ध्यान उन्मनि पांचांची मिळणी । सत्रावीचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥ दुभोनिया खडाणि नैश्वर्य ध्याय गगन । चेतलिया मन क्षीर देत ॥३॥ ज्ञानदेवीं समभाव त्रिगुणी नाहीं ठाव । आपेआप राणिव साई खडिया ॥४॥