भजनी मालिका
← भजनांकडे परत

साहोनि टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें

sahoni tankighaye | pashan dev chi jala pahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साहोनि टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥ बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥ तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥