भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुणीच्या रातीं निर्गुण दिवटा

sagunichya ratin nirgun divata

सगुणीच्या रातीं निर्गुण दिवटा । सांगती चोहटा वागपंथे ॥१॥ वागेश्वर हरि वाचेचा वाचक । आधीचाही अर्क दीपतेजें ॥२॥ साकारीं निराकार बिंबी बिंबाकार । अवघे माजघर बिंबलेंसे ॥३॥ बापरखुमादेवीवरु ॐतत्सदाकार । निवृत्ति निर्धार माजीवटा ॥४॥