भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण देह बापा निर्गुण माझें शीर

sagun deh bapa nirgun majhen shir

सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥ दैवी आसुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे । शून्यांतील सारे चराचर हें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा । नयनीं अर्धमात्रा सर्व जन ॥३॥