भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया

sadaiv tumhan avaghen ahe | hatapay chalaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥ मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥ घरा आगी लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥३॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥