भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचा । त्यांसी कैचा संसार

sadaiv he varakari | je pandhari dekhati | padopadin viththal vacha | tyansi kaicha sansar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचा । त्यांसी कैचा संसार ॥१॥ दोष पळाले पळाले। पैल आले हरीदास ॥ध्रु.॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥ दुर्बळा या शिक्तहीना । त्या ही जना पुरता ॥तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा ।३॥