भजनी मालिका
← भजनांकडे परत

साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों

sach majha devhara | bhak theva bhav khara | trigunacha phulavara | ana vinanti sangaton

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥ तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । निवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥ आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र होय । नवस पुरविते विठाई ॥४॥ उगविलीं कोडीं । मागें कित्येकाचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥