भजनी मालिका
← भजनांकडे परत

साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले

sach ha viththal sach hen karanen | sant jen vachanen boliyele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥ तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥