भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन

rupin jadale lochan | payin sthiravalen man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥ कळों नये सुखदुःख। तान हरपली भूक ॥२॥ तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥