भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप सामावलें दर्शन ठाकलें

rup samavalen darshan thakalen

रुप सामावलें दर्शन ठाकलें । अंग हारपलें तेचि भावीं ॥ पाहों जाय तंव पाहाणया वेगळें । ते सुखसोहळें कोण बोले ॥१॥ जेथें जाय तेथें मौनाचि पडिलें । बोलवेना पुढें काय करुं ॥२॥ सरिता ना संगम ओघ ना भ्रम नाहीं क्रिया कर्म तैसें झालें ॥ जाणों जाय तंव जाणण्या सारिखें । नवल विस्मय कवणा सांगों ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि अंगीं । निवृत्तिरायें वेगीं दाखविला ॥ तोचि सबरा भरितु । रुपनामरहितु निच नवा ॥४॥