भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋणाचेनि मिसें निर्गुण आलें आपैसें

runacheni misen nirgun alen apaisen

ऋणाचेनि मिसें निर्गुण आलें आपैसें । तेणें मज सर्वस्वें ठकियेलें ॥१॥ घेऊनि गेला माझें धन । केलें पै निर्वाण मना देखा ॥२॥ त्यासि वोळखिना अनोळखी । दृश्य ना अदृश्य ऋण म्यां सादृश्य दिधलें देखा ॥३॥ निवृत्ति प्रसादें इतुकें पै जालें । रखुमादेविवरु विठ्ठलें मज गोवियेलेगे माये ॥४॥