भजनी मालिका
← भजनांकडे परत

रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही

rikamen tun nako mana | rahon kshanakshana hi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥ वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥ भ्रमणांच्या मोडीं वाटा। न भरें फाटा आडरानें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥