भजनी मालिका
← भजनांकडे परत

रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें

rangin rangen re shrirange | kay bhulalasi patangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥ अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥