भजनी मालिका
← भजनांकडे परत

रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन

rangin rangen narayan | ubha kariton kirttan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥ हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥ तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥