भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी

ramakrushna namen ye donhi sajiri

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥ आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥