भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें

ram krushna aisin uchcharitan namen | nachen mi premen santampudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोन ॥३॥