भजनी मालिका
← भजनांकडे परत

रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी

rajju dharuniyan hatin | bhedasavilin nenatin | kalon yetan chittin | dori doghan sarikhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥ सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥ पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥