भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजस सुंदर बाळा पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो

rajas sundar bala pahon aliya sakala vo | bibin bimboni theli majhi parabramha velhala vo | koti ravishashi jichya angichiya kila vo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राजस सुंदर बाळा पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो ॥१॥ राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥ सकुमार साजिरी कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥ निर्गुण निराकार वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे भक्तां देत अभयकर वो ॥३॥ येउनि पंढरपुरा अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥