भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां

rahilon nirala | pahon kavatuk dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥ करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥ तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥