भजनी मालिका
← भजनांकडे परत

रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें

rachiyela ganv sagarache potin | jadoni gomatin nanaratnen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥ कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥ उभारिलीं दुर्गे दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥ शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरी ॥५॥ आले नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥ निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥ नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥ सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥ रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥ बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥