भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां

pusaven ten thai apulya apan | ahankara shunya ghaluniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥ फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥ तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥