भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या

purusha hatin kankanachuda | naval doda vrutti ya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥ जळो ऐसी ब्रिदावळी। भाटबोळीपणाची ॥२॥ तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे॥३॥