भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो

punyavikara ten matechen gaman | bhadi aisen dhan vital to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥ नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥ तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तोचि श्रोत्रीं ठेवी केली ॥३॥