भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया

pundaliken sukh dakhavilen lokan | viththal nam nauka taravaya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥ जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥ अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं । नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥ चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं । जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥