भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई

pritichiya bola nahin pesapad | bhalatasen god karuni ghei

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥ वेडे वांकडे ते बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥ तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥