भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा

priticha to kalavala | jivhalachi vegala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥ बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥ वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥ जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥