भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे

prem naye sangatan bolatan davitan | anubhav chitta chitta jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥ कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥ पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥ बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥ तुका म्हणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥