भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम जयाचें कथेवरी

prem jayachen kathevari

प्रेम जयाचें कथेवरी । तोचि धन्य ये चराचरी । रामकृष्ण निरंतरी । मुखीं आवडी जपतसे ॥१॥ धन्य धन्य तोची वंशी । धन्य धन्य माता कुशी । धन्य धन्य काळ तयासी । कृष्णराम ह्मणतांची ॥२॥ ऐसें धन्य जन्म तयाचे । धन्य धन्य पुण्य साचे । त्यासीं भय कळिकाळाचें । नाहीं जन्म घेतलिया ॥३॥ एवढा महिमा नामाचा । धन्य तो राम उच्चारी वाचा । धन्य जन्म तयाचा । ज्ञानदेव म्हणे ॥४॥