भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण

pravruttinivruttiche atuniyan bhag | utarilen chang rasayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोज । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥ ब्रम्हीं ब्रम्हरस सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥ स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥ अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥