भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो

prapanch vosaro | chitta tujhe payin muro

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥ ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥ लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥