भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राण समर्पीला आम्ही । आतां उशीर कां स्वामी

pran samarpila amhi | atan ushir kan svami

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्राण समर्पीला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥ जाला कंठस्फोट । जवळी पातलों निकट ॥२॥ तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥