भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला

praman hen tyachya bola | dev bhaktancha ankila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला॥१॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥ अवघा त्याचा होय । जीव भावाही सहित ॥२॥ वदे उपचारे वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥ उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें॥४॥