भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि

prajanyen padaven apulya svabhaven | apulalya daiven pike bhumi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥ बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥ काउळें ढोंपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥ तुका म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥