भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंड निर्माण जीवकळा सरिसी

pind nirman jivakala sarisi

पिंड निर्माण जीवकळा सरिसी । गति प्रवेशीं कैसी जाली ॥१॥ तेथीची रचना न कळे हो देवा । अनुभवाचा ठेवा काढुनी पाहे ॥२॥ वारपंगाचें लेणें लेवविसी जाई जेणें । परी घरांतील ठेवणें नुमगसी ॥३॥ अणुचें प्रमाण न साहे डोळां । कैसा मुक्तीचा सोहळा घेवो पाहसी ॥४॥ जळीं नांदला तो तरंगीं उमटला । मिळोनियां गेला सागरासी ॥५॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला उदारा । ज्ञानाचा वेव्हारा होई बापा ॥६॥