भजनी मालिका
← भजनांकडे परत

फळाचें बीज कीं फळ

phalachen bij kin phal

फळाचें बीज कीं फळ । म्हणौनि पत्र पुष्प मूळ चोजवेना ॥१॥ ऐसि हे रचना नकळे गा देवा । सिध्दांतु अनुभव साक्ष देतो ॥२॥ मृत्तिकेची पृथ्वी कीं पृथ्वीची मृत्तिका । या गति अनेका चोजवेना ॥३॥ बापरखुमादेविवरु निरंतरी । बाह्यअभ्यंतरी नांदतुसे ॥४॥