भजनी मालिका
← भजनांकडे परत

पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां

penavalen dhor mar khay pathi | baisalen ten nuthi tethuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥ तैसी माझ्या मना परी झाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥ तुका म्हणे झालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥