भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित

payampasin chitta | tenen bheti akhandit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥ केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना ॥३॥