भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया

pavavaven thaya | aisen saven bolon taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥ न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥ तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥