भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावतों ताडन । तरी हें मोकलिते जन

pavaton tadan | tari hen mokalite jan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावतों ताडन । तरी हें मोकलिते जन ॥१॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥ होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥ तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥