भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलोंजी म्हणे देखिलें जें देखणें

pavalonji mhane dekhilen jen dekhanen

पावलोंजी म्हणे देखिलें जें देखणें । गेली आधीं तेणें दृष्टि माझी ॥१॥ उचललिया बाह्या क्षेम देईन तया ॥ गेली माझी माया देहत्यागें ॥२॥ आनंदे स्फुंदत येती अश्रुपात । अगा गुरुनाथा देवराया ॥३॥ निवृत्तिदास म्हणें तूंतें जिवें वोंवाळिलें । शिर निरोपिलें तुझ्या चरणीं ॥४॥