भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान

pavalon prasad ichchha keli taisi | jhalen ya chittasi samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥ सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥ तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥