भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलों हा देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें

pavalon ha deh kagatali nyayen | na ghade upayen ghadon alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावलों हा देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥ अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥ तुका म्हणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥