भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाटीं पोटीं देव । कैचा हरीदासां भेव

patin potin dev | kaicha haridasan bhev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाटीं पोटीं देव । कैचा हरीदासां भेव ॥१॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥ एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥ तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥