भजनी मालिका
← भजनांकडे परत

पति जन्मला माझे उदरीं

pati janmala majhe udarin

पति जन्मला माझे उदरीं । मी जालें तयाचि नोवरी ॥१॥ पतिव्रता धर्म पाहाहो माझा । सर्वापरि पति भोंगिजे वोजा ॥२॥ निर्गुण पति आवडे मज आधीं माय । पाठीं झालीये भाज ॥३॥ मी मायराणी पतिव्रताशिरोमणि । ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी ॥४॥