भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर

pathivari bhar | jato vahuniyan khar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥ संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥ मोटचौफळ । अंतीं उच्छिष्टाचें बळ ॥२॥ न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥ आपुलिया सत्ता । चालविले नाहीं चिंता ॥४॥ कळवळिला तुका । जनाचार येथें नका ॥५॥