भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले

pathel karitan na sahave vara | saheliya dhora goni chale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥ आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥ नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥ तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥